
सर्जेराव देशमुख : पौडरोडवरील भुसारी कॉलनीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात प्रभाग १० मधील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन कुणाल वेडे पाटील आणि लक्ष्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रोशन मराठे यांच्या माध्यमातून केले होते. या उपक्रमात हृदयरोग, कर्करोग, किडनी, नेत्र, दंतरोग, अस्थिव्यंग यासारख्या विविध गंभीर आजारांची तपासणी व मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली. या शिबिरात माजी सभागृह नेते शंकर केमसे, उद्योजक अभय मांढरे, बाबा धुमाळ, सायली वांजळे, मिलिंद वालवडकर, शिवसेना नेते अविनाश दंडवते तसेच धनंजय दगडे-पाटील आदीसह मान्यवर उपस्थित होते.या शिबिरात प्रभाग क्रमांक १० मधील विविध सोसायट्यांमधील नागरिकांसह वस्ती भागातील ७,२४६ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. डोळे तपासणी करून २०८३ नागरिकांना चष्म्याचे वाटप यासोबत ४२३ महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली. या वेळी सामाजिक जाणीव ठेवत ३७८ जणांनी रक्तदान केले. तसेच, २६३ ज्येष्ठ नागरिकांची सहाय्यक उपकरणे वाटपासाठी नोंदणी केली. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कुणालआबा वेडेपाटील (मा अध्यक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खडकवासला) :- समाजातील प्रत्येक घटकाला उत्तम आरोग्य लाभावे, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आरोग्यधन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि त्यामुळेच, केवळ उपचारांची व्यवस्था न करता, सर्वसामान्यांच्या आरोग्याची परिपूर्ण काळजी घेण्याचं काम या शिबिरातून करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील सहभागी नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो.