Vaibhav Bhandari,Pune Election News
वैभव भंडारींच्या संवाद दौऱ्याला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद..
प्रतिनिधी (ता.८) :- Pune महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ ब मधील काँग्रेसचे उमेदवार वैभव भंडारी यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

त्यांच्या प्रभागातील संवाद दौऱ्यांना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे.

वैभव भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. प्रभागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांनी नेहमीच लोकहिताची भूमिका घेतली आहे.

वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करणे, नागरी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, तसेच सामान्य नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य राहिले आहे.

