
सर्जेराव देशमुख :- प्रभाग ३० मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सतत वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सतावत आहे. ही कोंडी निवारीत करणे आवश्यक असून त्यासाठी मी प्रयत्नशील असणार असल्याचे नगरसेवक स्वप्नील दुधाने म्हणाले.
सदर चौकातून मुख्य एनडीए रोडलगत मेट्रो होणार असून याकरिता वाहतूक कोंडी निवारीत करण्यासाठी प्रयत्न करणे, आवश्यक आहे. यावेळी मुख्य रस्त्याचे मोजमाप घेण्यात आले. सदर जागेवर उड्डाणपूल करणे अवश्य असून अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आज आंबेडकर चौकाची पाहणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता गोजारे, पथ विभागाचे उपअभियंता पुरुषोत्तम भूतडा आणि सर्व कर्मचारी यांच्यासह प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
