वॉकेथॉन मधून मधुमेहा विषयी जागृती व तपासणी

सर्जेराव देशमुख : योग्य काळजी घेतली तर मधुमेह हा नियंत्रणात येवू शकतो. मधुमेह आहे म्हणून मनावर ओझं घेवून जगण्यापेक्षा मधुमेह काय आहे हे समजून घेवून त्याला नियंत्रीत ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार, व्यायाम, आनंदी सहजीवन, निसर्गाचे सानिध्य यावर भर द्यावा. असे मत डॉ. अरुंधती खरे यांनी व्यक्त केले.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त पुण्यातील तळजाई टेकडीवर नित्याशा फाऊंडेशनच्यावतीने वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोफत मधुमेह चाचणी, मधुमेहा विषयी जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
लेटस मिट लायन्स क्लबचे प्रांतपाल दिपक लोया, प्रविण खुले, रोटरी क्लबचे किरण इंगळे, नित्याशा फाऊंडेशनच्या नसीमा मर्चंट यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
सुभाषिनी नओरेम यांनी स्वागत केले. जितेंद्र मैड यांनी सुत्रसंचालन केले.हेमा जाधव, योगेश सरोदे, वंदना रिंगणमोडे, केतन ढाकणे, सुप्रिया माळी, उझमा मर्चंट आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

