
Ladki Bahin Yojana : Big announcement for women in Delhi – Rs 2500 per month
Ladki Bahin Yojana :दिल्लीतील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! भाजप सरकारच्या घोषणेनुसार, दिल्लीतील पात्र महिलांना दर महिन्याला 2500 रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. 8 March , आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून या योजनेच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे या विशेष कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
महिला सन्मान योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:
✔ दर महिन्याला 2500 रुपये: पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा
✔ 8 मार्चपासून नोंदणी सुरू: महिला दिनानिमित्त मोठी घोषणा
✔ भाजप सरकारचे निवडणूक वचन पूर्ण: पंतप्रधान मोदींनी दिलेली गॅरंटी
✔ दिल्ली सरकारची तयारी पूर्ण: मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची घोषणा
योजनेसाठी पात्रता कोणती?
🔹 दिल्लीतील महिला असणे आवश्यक
🔹 विशिष्ट उत्पन्न मर्यादेखालील महिलांना लाभ मिळणार
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे आता दिल्लीतील महिलांचे लक्ष या योजनेच्या अंमलबजावणीवर आहे.