
सर्जेराव देशमुख : वृत्तपत्र विक्रेते व मनसेचे उपविभाग अध्यक्ष रमेश उभे यांच्या मनसे पक्षाच्या भुसारी कॉलनी प्रभाग क्रमांक १० येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी लेखक योगेश भागवत, रेल्वे पोलिस बाळासाहेब कोंडे, मनसे नेते किशोर शिंदे, माजी नगरसेवक राजा गोरडे, हेमंत संभुस, प्रशांत कनोजिया, किरण उभे, ह भ प दशरथ महाराज पोळेकर, मराठा समन्वयक गणेश जरंगे पाटील, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सचिव अरुण निवंगुणे, गणेश कोंडे, आकाश तापकीर, चेतन चव्हाण, संदीप येनपुरे, हनुमंत येनपुरे अक्षय भिकुले, सुभाष काळोखे आदींसह मान्यवर या वेळी उपस्थित होते.
रमेश उभे अनेक वर्षापासून पहाटे उठून भुसारी – कोथरूड भागात वृत्तपत्र टाकायचे काम करत आहे. यामुळे प्रत्येक भागाची सखोल माहिती असून भागामध्ये असलेल्या समस्या माहिती आहे. अनेक समस्यांबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार केला असून वेळप्रसंगी आंदोलन करून समस्या सोडविण्यास यश मिळवले आहे अशीच समाज विधायक कामे येत्या भविष्यकाळात प्रभाग १० मध्ये ते करतील, असा विश्वास वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांनी व्यक्त केला.
जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी विविध सोसायट्यांमधील, बावधन गावांतील नागरिकही उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. त्यावरून त्यांचा जनसंपर्क किती दांडगा आहे, याची नागरिकांमध्ये सुरू होती.
