
On the day of Ram Navami, keep this miraculous picture in your home! It will bring happiness, prosperity and success.
Ram Navami:हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व दिलं जातं. घरातील प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा आणि सुख-समृद्धी आणण्यासाठी योग्य दिशेने देवी-देवतांची चित्रे लावली जातात. श्रीरामाचे चित्र घरात लावल्यास घरात शांती, समृद्धी आणि सुखाचे वातावरण निर्माण होते.
Ram Navami च्या दिवशी भगवान श्रीरामाचे चित्र घरात लावणे विशेषत: शुभ मानले जाते. 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमी साजरी होईल आणि या दिवशी राम दरबाराचे चित्र घराच्या पूर्व दिशेला लावल्याने घरातील वास्तु दोष नष्ट होतात. वास्तुशास्त्रानुसार, श्रीराम दरबाराच्या चित्राचे प्रभावी स्थान म्हणजे पूजागृहाच्या पूर्व दिशेला असलेल्या भिंतीवर असावा.
घरात श्रीराम दरबाराचे चित्र ठेवण्यामुळे घराच्या सर्व सदस्यांचे जीवन सुधारते. कुटुंबात सौम्यता आणि सौहार्द कायम राहतो. प्रत्येक सदस्याच्या जीवनात प्रगती, समृद्धी आणि सुख येते. तसेच, नियमित पूजा केल्यास शांती आणि सौभाग्य देखील वाढते. राम दरबाराची स्थापना केल्याने जीवनातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता निर्माण होते.