सर्जेराव देशमुख : प्रशांत दामले हे अत्यंत लोकप्रिय अभिनेते असून १६ नोव्हेंबर ला त्यांचा विक्रमी असा १३३३३ वा नाट्य प्रयोग सादर होईल त्यासाठी आपली तारीख राखून ठेवा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या कोथरूड नवरात्र महोत्सवात ” शिकायला गेलो एक” ह्या विनोदी नाटकाच्या मोफत प्रयोगाच्या वेळी ते बोलत होते.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, श्वेताली भेलके, सांस्कृतिक महोत्सवाचे संयोजक व शिवसेना (उबाठा गट) चे संघटक उमेश भेलके, अक्षदा भेलके, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, कोथरूड मध्य चे भाजपा मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, क्रिएटिव्ह फौंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर,सौ. कल्याणी खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
नवरात्रीतच नव्हे तर कायमच स्त्री शक्ती चा सन्मान केला पाहिजे. क्रिएटिव्ह फाउंडेशन व कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे कार्य गौरवास्पद आहे असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या. प्रशांत दामले हे “नट” म्हणून आणि “माणूस” म्हणून ही श्रेष्ठ असे संदीप खर्डेकर म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने श्रमदान मारुती मंडळ ग्रंथालयास अजय कोंढरे व मोहनीश सावंत यांना अकरा हजाराची मदत देण्यात आली, तसेच कुंबरे गार्डन गणेशोत्सव मंडळाचे ऋषिकेश कुंबरे व स्वर्गीय रखमाबाई ताडगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल ताडगे यांना स्पीकर सेट देण्यात आला.

