
Suryakumar Yadav: Bought two luxurious flats in Mumbai, you will be surprised to hear the price figure
Suryakumar Yadav IPL 2025 च्या सीजनमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याने मुंबईत दोन आलिशान फ्लॅट्स विकत घेतले आहेत. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स टीमकडून खेळत असून, त्याला 16.35 कोटी रुपयात रिटेन करण्यात आले आहे. मात्र त्याने जे फ्लॅट्स विकत घेतले आहेत, त्यांची किंमत त्याच्या IPL कमाईपेक्षा दीडपट जास्त आहे.
सूर्यकुमार यादवने हे दोन्ही फ्लॅट्स मुंबईच्या देवनार भागात विकत घेतले आहेत. या दोन्ही फ्लॅट्सची एकूण किंमत ₹21.1 कोटी आहे. IPL 2025 मध्ये सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्स कडून ₹16.35 कोटी मिळणार आहेत. यानुसार त्याने जे फ्लॅट्स विकत घेतले आहेत, त्याची किंमत त्याच्या सीजन कमाईपेक्षा जास्त आहे.
कुठे विकत घेतलेत फ्लॅट?
सूर्यकुमार यादवचे हे दोन्ही फ्लॅट्स गोदरेज स्काय टेरेस प्रोजेक्टमध्ये आहेत. यांचे एकूण कार्पेट एरिया 4,222.7 चौरस मीटर आहे. सूर्याचे हे दोन्ही फ्लॅट्स वेगवेगळ्या मजल्यांवर आहेत आणि इमारतीत 6 लेयर कार पार्किंग सुविधा देखील उपलब्ध आहे.
सूर्याच्या नेतृत्वात पराभवाची सुरुवात
सूर्यकुमार यादव सध्या IPL 2025 मध्ये खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पहिल्या सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सच नेतृत्व केलं. हार्दिक पंड्यावर बंदी असल्यामुळे सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवण्यात आलं होतं, मात्र त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला विजय मिळवता आला नाही आणि चेन्नई सुपर किंग्सने 4 विकेट्सने मुंबईला पराभूत केलं.
मुंबईचा पुढचा सामना कोणाविरुद्ध?
IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना गुजरात टायटन्सशी 29 मार्चला अहमदाबादमध्ये होईल. या सामन्यात सूर्यकुमार यादव कॅप्टन म्हणून नाही, तर खेळाडू म्हणून टीमसाठी विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.