सर्जेराव देशमुख : पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्ते गुळगुळीत होणार असल्याचे समजले. ही निश्चितच पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र प्रामाणिकपणे मनपा चे सर्व कर भरणाऱ्या वर्गाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
दुचाकी वरून प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बंधू, विद्यार्थी, सामान्य कष्टकरी, कामगार वर्ग असे सर्व सामान्य पुणेकर. ज्या गल्लीबोळातून प्रवास करत असतात आणि रस्त्याची झालेली चाळण यामुळे प्रवास करणे खडतर झाले आहे हे बघवत नाही. शहरात खड्डेयुक्त रस्त्यांची यादीच भली मोठी आहे, सध्या पावसाने माघार घेतली असून रस्त्यांच्या कामासाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे आयुक्त यांनी गंभीरपणे लक्ष घालून ” मुख्य रस्त्यांप्रमाणे गल्लीबोळांचे डांबरीकरण देखील त्वरित सुरु करावे ” आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी केली असून त्याबाबचे पत्र आयुक्तांना दिले असल्याचे ते म्हणाले.
तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून खड्डयांनी भरलेल्या रस्त्यांची सूची तयार करवून घ्यावी आणि त्यांचे डांबरीकरण कधी होणार याची माहिती पुणेकरांना द्यावी अशीही मागणी खर्डेकर यांनी केली आहे.