
सर्जेराव देशमुख:- दैनंदिन जीवनामध्ये समाजातून आपल्याला कळत व नकळत मदत होत असते. यामुळे समाजाचे आपण नेहमी देणे लागत असतो, या भावनेतून सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी भावना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे स्वप्निल दुधाने यांनी व्यक्त केली. महात्मा गांधीजी यांची जयंती देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाली. यानिमित्ताने प्रभागातील मावळे आळी येथील बौद्ध विहार येथे मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मावळे आळी, कामना वसाहत, गोसावी वस्ती, कर्वेनगर गल्ली नं. १ ते ११, गावठाण येथील तसेच अन्य नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सामाजिक कार्यकर्ते दीपक साकळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रमोद शिंदे, विष्णू सरगर, अतुल खसे, राजेश थोपटे, किशोर शेडगे, सुरज शिंदे, अमित गोडांबे यांच्यासह परिसरातील न्यू सन्मित्र मित्र मंडळाचे संजय औजी, प्रशांत यादव, मंदार गायकवाड, सागर गायकवाड, विशाल तांबे, गणेश गायकवाड, हर्षल साकळे, सुजाता गायकवाड आदीसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमामध्ये ४८७ हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी केली असून त्यापैकी २६७ नागरिकांना मोफत चष्मे प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी ७० नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून जतन फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली. या उपक्रमाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.