
Wedding and Devdarshan: Why do newlyweds go to Jejuri?
jejuri : अगदी सुपारी फोडणे, केळवण ते हळद उतरवण्याचा विधी सगळ्याचे रोज नवनवीन व्हिडिओस पहायला मिळत आहेत. ज्यातून लग्न कार्यावेळी किती वेगवेगळ्या प्रथा- परंपरा पाळल्या जातात हे आपल्याला पहायला मिळतंय.
लग्नाआधी आणि लग्नानंतर देवदर्शनाचे महत्त्व
सध्या लग्नसराई सुरू असून, पारंपरिक प्रथा आणि परंपरांचा उत्साह वाढला आहे. लग्नाआधी कुलदैवत, ग्रामदैवत आणि इतर पवित्र स्थळांचे दर्शन घेतले जाते, जेणेकरून विवाह निर्विघ्न पार पडावा. लग्नानंतर नवदाम्पत्य जेजुरीच्या खंडेरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी हमखास जातात.
जेजुरीला का जातात?
खंडोबा हे अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे, तसेच ते भगवान शिवशंकरांचे रूप मानले जाते. नवदाम्पत्याच्या वैवाहिक आयुष्यात सौख्य यावे, यासाठी ते खंडोबाच्या दर्शनाला जातात. शिवाय, सध्या सोशल मीडियाच्या ट्रेंडनुसार जेजुरीच्या भंडाऱ्यात रील्स बनवणेही नवीन परंपरा झाली आहे.
आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे लग्नानंतर जेजुरीला का जातात? कोणत्याही देवस्थानाला गेले, नाही गेले, खंडोबा त्यांच कुलदैवत असू न असू तरीसुद्धा जेजुरीला अनेक जोडपी जातातच. ज्याची दोन महत्वाची कारणे सांगितली जातात. पाहिलं कारण म्हणजे एकतर जेजुरीचा खंडेराया हा महाराष्ट्रातील अनेक कुटुबांच कुलदैवत आहे, त्यामुळे कुलदैवताचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेकजण जेजुरीला जातात.
