
INDIA AMERICA
भारतीय लोकांचं US वरचं प्रेम काही केल्या संपत नाही. पण त्यासाठी काहींना अवैध मार्गांचा आधार घ्यावा लागतो. Donald Trump प्रशासनाने पुन्हा एकदा illegal immigrants वर कठोर पावलं उचलत 104 भारतीयांना deport केलं.
US ला जाण्याचं वेड का?
भारतामध्ये high unemployment rate आणि कमी salary अमेरिकेकडे आकर्षित करतं. अमेरिकेत Indian families ची सरासरी वार्षिक कमाई $1,45,000 पर्यंत जाते, जी भारतीय लोकांसाठी एक मोठी संधी वाटते.
कसे पोहोचतात US मध्ये?
- डंकी रूट – जंगल, समुद्र, desert ओलांडत लोक अमेरिका गाठतात. ह्याला लाखो रुपये लागत असूनही लोक हे धाडस करतात.
- Canada Route – काही लोक आधी Canada चा वीजा घेतात आणि नंतर तिथून US मध्ये illegally प्रवेश करतात.
US मध्ये काय परिस्थिती असते?
- अवघड नोकऱ्या – वॉशिंग डिशेस, ड्रायव्हिंग, आणि गोदामांमध्ये पॅकिंग अशी कमी पगाराची कामं करावी लागतात.
- डर नेहमी असतो – कोणत्याही क्षणी deportation होऊ शकतं.
- नो डॉक्युमेंट्स, नो फायदे – सरकारी मदतीशिवाय जगणं कठीण होतं.
American Dream worth आहे का?
काही लोकांना ग्रीन कार्ड मिळतं, पण हजारो लोक लपून जगतात. हा संघर्ष आणि धोक्यांनी भरलेला प्रवास खरंच Worth It आहे का?