
चार टॉप, चार बेसपेक्षा अधिक स्पीकर लावणाऱ्या मंडळांचे स्पीकर उतरविले
सर्जेराव देशमुख : कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिक्षेपकांच्या नियमबाह्य वापरावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आज दहीहंडी उत्सवानिमित्त पोलिस स्टेशन हद्दीतील चार टॉप व चार बेसपेक्षा अधिक स्पीकर लावणाऱ्या मंडळांचे अतिरिक्त स्पीकर पोलिसांनी तात्काळ उतरवून घेतले.
ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांकडून मंडळांना देण्यात आल्या आहेत. मात्र, काही मंडळांकडून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनिक्षेपक लावण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी संबंधित मंडळांवर कारवाई केली.
कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांमध्ये खळबळ उडाली आहे. गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

