नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सर्जेराव देशमुख : कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एकलव्य कॉलेज परिसरातील मिसिंग लिंक रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली.
नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी या रस्त्याच्या प्रश्नासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून मिसिंग लिंक रस्त्याच्या विषयाला गती मिळाली असून रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जाते.
यावेळी बैठकीस मोहिते कॉलेजचे प्रमुख संदीप संत, एकलव्य कॉलेजचे प्रमुख राजेश नाकडे, पथ विभाग प्रमुख राजेश बनकर, पुरषोत्तम भुतडा, भूसंपादन विभागाचे बांगर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
रस्त्याच्या कामासंदर्भातील तांत्रिक व प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. एकलव्य कॉलेज परिसरातील मिसिंग लिंक रस्ता हा कोथरूडमधील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
यावेळी संबंधित अडचणी दूर करून आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या बाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
