
सर्जेराव देशमुख : आषाढी वारीसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोथरूड वैद्यकीय मंच, कोकण महासंघ, एमएचजीपीए आणि लायन्स क्लब 21 सेंचुरी यांच्या संयुक्त विद्यमाने औषधांचे संकलन करण्यात आले.
गेल्या १५ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, संकलित औषधे सहयोग फौंडेशनच्या माध्यमातून वारकऱ्यांना मोफत वितरित केली जातात.पुणे ते पंढरपूर या वारी मार्गावर सहयोग फौंडेशनच्या माध्यमातून वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा आणि आवश्यक औषधोपचारही उपलब्ध करून दिले जातात.
नगरसेविका मनिषा बुटाला यांच्या हस्ते ही औषधे आणि वैद्यकीय मदत सहयोग फौंडेशनकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आली.यावेळी कोथरूड वैद्यकीय मंचचे डॉ. संजय बुटाला, कोकण महासंघाचे तुकाराम जाधव, सहयोग फौंडेशनचे उल्हास तापकीर, लायन्स क्लब 21 सेंचुरीच्या सौ. प्रितम गांधी, डॉ. संदीप बुटाला, नगरसेवक बाबा धुमाळ, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, डॉ. शुभदा जोशी, अभय गांधी, कोकण महासंघाचे दशरथ माटवणकर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजसेवेची संधी असल्याचे सांगत, वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
