सर्जेराव देशमुख : सह्याद्री कुणबी संघ, कोथरुड विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. कोथरुड येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा ५७० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांना वह्या व अन्य शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विभागाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धनंजय पंडव, जगदीश बडंबे, विराज डाकवे, सागर धूलप, मंगेश मळेकर, सुनील भितले, वैभव भावे, समीर इत्ते, विशाल भावे, योगेश टोले आणि वैभव सांगले यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी विठ्ठल काका नाईक, विठोबा काका भावे, उमेश मामा बुरटे, प्रविणजी रामाने, अजितभाऊ शिगवण यांच्यासह महिला आघाडीच्या वर्षा घडशी, अंकिता शिगवण, ज्योती घडशी, गौरी मळेकर, बडंबे ताई आणि जाधव ताई उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव भावे यांनी केले. तर विराज डाकवे यांनी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी तसेच आर्थिक मदत व वह्यांचे सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस बळ देणारा हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. भविष्यातही अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार सह्याद्री कुणबी संघ, कोथरुड विभागाने व्यक्त केला.
